SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्या कुपवाडमधील तरूणास अटक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढणार असल्याचे चित्र आज दिसून आले. एकीकडे शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फे केले तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्याचवेळी अजित पवार यांनी नऊ जणांना पाठवलेल्या नोटीससंदर्भात भूमिका मांडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही लढाई कायद्याची लढाई होणार आहे.
अजित पवार यांनी सांगितले की, पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्यासोबत आहे. त्यामुळे नोटीस काढण्याचा अधिकार कोणाला नाही. आमच्या नऊ जणांना ते नोटीस काढू शकत नाही. आताच प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सर्वच अधिकार असणार आहे. नोटीस काढण्याचा प्रकार म्हणजे आमच्या आमदारांना घाबरवण्याचा
प्रकार आहे. परंतु सर्वच आमदार आमच्यासोबत आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नवीन नियुक्ती प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची त्यांनी नियुक्ती केली आहे. राज्यातील नियुक्ता करण्याचे अधिकार सुनील तटकरे यांना असणार आहे. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेली नियुक्ती रद्द करत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपण हा निर्णय घेतला असल्याचा त्यांनी सांगितले. अजित पवार विधिमंडळाचे नेते म्हणून निवड जाहीर केली आहे.
शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांच्या इच्छेचा आदर करावा, अन् त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा